Skip to main content

Posts

Showing posts from 2017

समाजकार्याचा पूर

सामाजिक काम म्हणजे काय ? माझ्या मते जगात सामाजिक काम नावाची वस्तू वगैरे काही नसते. असते ते फक्त काम, आवडते किंवा नावडते आणि प्रत्येक कामातून आपण समाजातील कुठल्या तरी व्यक्तीला वस्तू किंवा सेवा पुरवीत असतोच. मग तो सकाळी वर्तमान पत्र वाटणारा असो किंवा कार्पोरेट कंपनीतला एक आय.टी इंजिनिअर असो. मी शेतकर्याचे प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो म्हणून मी सामाजिक कार्यकर्ता आणि जो शेतकरी अक्ख आयुष्य इतके काबाड कष्ट करून तुम्हा आम्हाला अन्न पुरवतो, त्याला काय म्हणाव ? जात-पात, धर्म-पंथ, वर्णभेद हि असमानता काय कमी होती कि आता आपण कामात पण असाच भेदभाव करायला लागलो आहे. “द सेल्फिश जिन” या पुस्तकात रिचर्ड डॉकिन्स लिहतो कि “या पृथ्वी वरील एक एक जीव हा भयंकर स्वार्थी आहे, आणि या स्वार्थीपणामुळेच आपले अस्तित्व आहे.” आपले पूर्वज स्वार्थी नसते तर आपण आज सामाजिक कामाबाद्द्दल बोलायला जिवंत नसतो. प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक कामात स्वार्थ असतो आणि त्या स्वार्थापोटी  तो/ती ते काम करत असतो. आता हा स्वार्थ नेहमी व्यक्तीनुसार बदलत असतो. हुशार स्वार्थी लोक निसर्ग, आरोग्य, शेती वगैरे महत्वाच्या क्षेत्रा...

उद्या कि आज ?

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या जीवनावश्यक मुल्यांचा पूर्णपणे विसर पडलेल्या भविष्यातील समाजाचे, ज्याला जीवनातील प्रत्येक गोष्टी मध्ये मुल्यवृधी ची सवय झालेली आहे, अश्या या परिस्थितीत मनुष्याच्या खाजगी जीवनावरील अतिक्रमण, मोठमोठ्या कंपनीचे आक्रमक धोरणे आणि त्याचे मानवी जीवनावरील होणारे दुष्परिणाम याचे विस्तृत विवरण नंदा खरे यांनी “ उद्या” या कादंबरीत केलेलं आहे. मुल्यवृधीच्या मागे पळत असलेल्या ” उद्या “ कांदबरीतील विविध पात्रांच्या जीवनावरून त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील मुल्यावृधीचा ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं आहे. नातीगोती खूप क्वचित झालेली आहे. लोकांच्या जीवनातील प्रेम,करुना या भावनेचे स्थान आता मुल्यवृधीने घेतलेले आहे. परिणामी समाजात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे. निसर्गत कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्री वर याचा खूप वाईट परिणाम झालेला आहे. स्त्रियांचे बाहेर एकटे पडणे अशक्य झालेलं आहे. भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नं...