Skip to main content

Posts

Showing posts with the label Exploitation

तंत्र-न-ज्ञान

गेल्या अनेक वर्षापासून मानवप्रजाती मंगळावार घर वसवण्याची गोड स्वप्न बघत आहे. काळ इतक्या वेगाने बदलतो आहे की तंत्रज्ञानाच्या जोरावर काहीही करू शकण्याची धम्मक आता मानवप्रजाती बाळगत आहे. पण हा प्रवास इतका सहज आणि सोपा नव्हता , इथपर्यन्त पोहोचायला सुद्धा माणसाला बरीच वर्षे लागली. अश्मयुग , धातुयुग , यंत्रयुग , अश्या विविध टप्प्यातून आजचे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. सध्या आपण माहिती तंत्रज्ञान आणि बिग डाटा या युगात जगतो आहे हे म्हणायला हरकत नाही. यंत्रयुगात ४ औद्योगिक क्रांत्या घडून आल्या. पाणी आणि वाफेचा शक्तीचा उपयोग करून यंत्र चालवून उत्पादन करणे हे पहिल्या औद्योगिक क्रांति मध्ये शक्य झाले. दुसर्‍या मध्ये विजेचा वापर करून आणि तिसर्‍या मध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे औद्योगिक क्रांति घडून आली. आता आपण बघत असलेली ही चौथी औद्योगिक क्रांति आहे ज्यात तिसर्‍या औद्योगिक क्रांतीतील काही घटक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), इंटरनेट ऑफ थिंग्ज , जनुकीय तंत्रज्ञान( Genetic Engineering ) , यंत्रमानव आणि रोबोटिक्स अश्या विविध वेगवेगळ्या गोष्टींचा उपयोग करून अश...

प्रगतीच्या वाटा.

साल २०१३ पासून विकास या शब्दाचा उपयोग आपल्या देशात बराच होताना दिसतोय. २०१४ ची पूर्ण लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा या दोन्ही निवडणूका एका मोठ्या पक्षाकडून विकास हा मुद्दा घेऊनच लढल्या गेल्या. "सबका साथ , सबका विकास" हा नारा देऊन भारतीय जनता पक्षाने दोन्ही कडे मोठा विजय संपादित केला. अर्थातच विकास किंवा प्रगति या मुद्द्यावर निवडणूक लढणे ही लोकशाही साठी जमेची बाब आहे. सगळ्यांचा विकास होईल हे नक्कीच छान आहे , आणि त्याची गरज सुद्धा आहे. पण भारतासारख्या   वैविध्यपूर्ण देशात सर्व लोकांचा विकास हा सारखाच असणे अपेक्षित नाही अथवा प्रदेशानुसार आणि लोकांनुसार विकासाचे स्वरूप हे नक्कीच वेगळे असणार. त्यामुळे लोकांची गरज काय आहे याचा विचार न करता आपल्या प्रस्थापित विकासाच्या परिभाषा आणि विकास त्यांचावर लादणे हा एक प्रकारचा अन्यायच असेल. माणसाचा विकास म्हणजे नेमके काय ? संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाच्या(युनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्राम) मानवी विकासाच्या परिभाषेत अर्थव्यवस्थेच्या एकंदर वाढीला प्राध्यान न देता मानवी जीवन कितपत समृद्ध आहे याला महत्त्व दिले आह...

शेती विना माती.

गेल्या एक महिन्यापासुन इतर देशाप्रमाणे आपल्या देशात सुद्धा कोरोना नामक रोगाने थैमान घातला आहे. रोगाचा प्रसार रोखण्याकरिता संपूर्ण देशात २४ मार्च पासून संचारबंदी(लॉकडाऊन) लागू करण्यात आली. एकूणच संचारबंदी हि समाजातील सर्व घटकांचा विचार न करता केल्यामुळे बऱ्याच लोकांची वाताहत होताना आपण गेल्या १ महिन्यापासून बघतोय. देशभरात मजूर लोकांची दयनीय अवस्था झालेली आहे. स्थलांतरित कामाच्या ठिकाणी काम आणि परिणामी जगण्याकरिता लागणारा पैसा उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडे मूळ गावी जाणे हाच एकमेव पर्याय उपलब्ध होता. पण दळणवळणाची कुठलीच साधने उपलब्ध नसल्याने मोठा मजूर वर्ग हा चालत चालत समोर निघून गेला. साधने आणि दुकानाच्या अनुपस्थितीमुळे या लोकांना खायला काही मिळत नव्हते आणि इतक्या मोठ्या संख्येत असलेल्या लोकांची वेगवेगळ्या ठिकाणी सोय करणे हे सुरुवातील सरकारी यंत्रणेला झेपण्यासारखे पण नव्हते. अश्या या अवस्थेमध्ये समाजातील बऱ्याच लोकांनी आणि विविध संस्थांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त लोकांना   पुरेपूर अन्न पुरवण्याचा प्रयत्न केला गेला , आणि हे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहे.   ...

आरोग्यवारी

गेल्या आठवड्यात ३ दिवस काही कामानिमित्त मेळघाट आणि धारणी ला जाऊन आलो. त्यावेळी  नागपुरात आधीच कोरोनाचे ४ रुग्ण होते आणि सार्वजनिक ठिकाणे , कार्यक्रम बंद झाली होती. मोठं शहर असल्यामुळे नागपुरात बऱ्यापैकी लोकांमध्ये कोरोना या आजारबद्दल माहिती होती , काय करावे आणि काय करू नये याबद्दलची जागरूकता पण होती. त्यामुळे लोकं सावध पवित्रा घेऊन होते , शक्यतो बाहेर जायचे टाळत होते. पण मेळघाट किंवा धारणी मध्ये अशी परिस्तिथी नव्हती. लोकांना कोरोना नामक आजार आला आहे यापलीकडे आजाराबद्दल काहीच माहिती नव्हते. परिणामी घ्यावी ती काळजी घेतल्या जात नव्हती. त्यात भर म्हणजे इस्पितळ आणि औषधांची दुकाने हे बहुतेकदा मोठ्या खेड्यात आणि तालुकाच्या ठिकाणीच होते. बरीच गावे अशी होती जिथे साधा कच्चा रस्ता पण नव्हता मग बाकी सुविधां तर दूरची गोष्ट आहे. अश्या ठिकाणी जर एखाद्या कोरोनासारख्या साथीच्या रोगाची लागण झाली तर परिस्तिथी किती गंभीर आणि चिंताजनक होऊ शकते याचा अंदाज आपण लावू शकतो. शहरामध्ये आरोग्य सेवा , औषधे या सुविधा अगदी सहज उपलब्ध असतात , त्यामुळे रोगराईला आटोक्यात आणणे सहज शक्य असते. पण ग्रामीण भा...

कामाचं काय ? भाग २

गेल्या सदरात काम आणि काम करण्याचा पद्धतीमध्ये कश्याप्रकारे नीती आणि मूल्यांची सोयीस्कर सांगड घालून काही विशिष्ट कामे हि अति महत्त्वाचे आणि बाकी सारे दुय्यम अशी वर्गवारी तयार करण्यात आली आहे किंवा घडलेली हे आपण बघितलं , हि वर्गवारी तर कामाकडे बघणाच्या दृष्टिकोनातून घडलेली आहे.  पण हे इथेच थांबते काय तर मुळीच नाही. कामाची परिभाषा , कौशल्य आणि काम करून मिळणार मोबदला यात पण वर्गवारी आहेच. कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या देयकांबद्दल बोललं तरी जाते पण कौशल्य आणि कामाची परिभाषा याबद्दल फारसा कुणी विचार करताना दिसत नाही , आणि याबद्दल भविष्यात पण फार काही होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही आहे. वर्गवारिचे नुकसान सोसनाऱ्या वर्गाला बहुतेकदा याबाद्द्दल माहिती नसते आणि असली तरी अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण या मूलभूत गरज पूर्ण करण्यातच त्यांचा बराचसा वेळ आणि ऊर्जा निघून जाते. ज्यांना खरोखर वर्गवारीबद्दल माहिती असते त्यांना बहुतेकदा वर्गवारीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फायदाच होत असतो म्हणून तो स्वतः असलेल्या सोयीस्कर वर्गात खिंडार पाडू इच्छित नाही. परिणामी हि वर्गवारी अशीच ब...

वाघ एके वाघ.

बाबाराव , गेल्या ४ - ५ वर्षांपासून २मुख्य समस्यांनी ग्रासलेले आहे . पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढत त्रास आणि दुसरी म्हणजे नाईलाजाने / बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर . बाबाराव वर्धा जिल्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे . नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी - म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय . गावालगतच कुरण आणि जंगल यावर गाई - म्हशी साठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार . त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा . जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरत्या व्हायचे . तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशु होतेच , त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला . तरीपण याआधी बाबारावला   अश्या प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही . सध्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरु आहे यावर बाबाराव ला हसावे कि रडावे हेच ...