Skip to main content

Posts

Showing posts with the label Maharashtra

सावजी रस्सा

“नागपूर मधे अस्सल सावजी कुठे मिळते ?” हा नागपूर भ्रमंती वर असलेल्या बहुतांश लोकांचा अगदी ठरलेला प्रश्न आहे. त्यात आणखी भर म्हणजे बऱ्याच लोकप्रिय वायरल इंस्टाग्राम रिल्सच्या प्रभावामुळे सावजीच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली. झणझणीत तिखट रस्यासोबत मासाहर, पाटवडी आणि सोबत भाकरी याचे बरेच शौकीन आहेत. नागपूरच्या बाहेरील लोकांना नागपूरकर इतके तिखट आणि मसालेदार अन्न कसे पचवत असतील याबद्दल नेहमी कुतुहूल असते. २०२५ साली सिंगापूरमध्ये एका आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवात नागपूरच्या सावजी पाककृतीचे कौतुक झाले होते. सावजी आणि नागपूर जणू काही आता एका नाण्याचा दोन बाजू झाल्या आहेत. पण अगदी 150 वर्षाआधी सावजी नावाच्या पाककृतीचे आणि नागपूरचे दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हते. आज सावजी खाणे म्हणजे मेजवानी, काही तरी विशेष याउलट सावजी पाककृतीचा उगम झाला तो म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षेला पूर्ण करण्यासाठी. कामगार वर्गाच्या कल्पकतेतून आणि प्रसंगावधेतून निर्माण झालेली पाककृती म्हणजे आजची आपली किंवा आपला सावजी. 1877 साली जमशेदजी टाटांनी नागपूर शहरात शुक्रवारी तलावाच्या बाजूला एम्प्रेस मिल उभारली. विदर्भात मोठ्या प्र...

इवेंटीकरण

गेल्या काही वर्षापासून लोकांचा किंवा कमीत कमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणार्‍या घटनांच्या( Events ) बाजूने जास्त दिसतोय , आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी प्रणाली , खाजगी कंपनी , निवडणुका , सामाजिक संस्था आणि इतरत्रही , जणूकाही समाजाला मोठमोठ्याला सतत होणार्‍या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे. घटना (Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काही तरी अपेक्षित असतेच असे नाही. बर्‍याचदा काहीही समोर मागे नसतांनाही घटना घडवल्या जातात किंवा साजर्‍या केल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून घटना घडायच्या किंवा साजर्‍या केल्या जायच्या , त्यामुळे त्यामागे काही कारणे असायची , त्यातून काही तरी अपेक्षित असायचे. पण आता असे दिसत नाही प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्व दिले जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे होताना दिसत नाही. पण प्रक्रियेतील प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव...