इयत्ता पहिली आणि दुसरी मध्ये असताना मला घरून पैशे चोरायची वाईट सवय लागली होती. पैशांच्या नोटा चोरून मी शालेय पुस्तकांमध्ये ठेवत असे. तेव्हा माझा समज असा होता की पुस्तकांमध्ये पैशे ठेवल्याने दुप्पट होतात. याचप्रमाणे मी नाणे चोरून घराजवळच्या एका विहिरीत टाकायचो , कारण पुन्हा तेच की नाणी दुप्पट होऊन वर येतात. माझ्या चोरीच्या सवयीबद्दल जेव्हा घरी कळाले तेव्हा मला भरपूर चोप बसला आणि मला जवळपास मध्यरात्रीच्या समोरपर्यंत बाहेर ठेवण्यात आले होते. हे सर्व घडलं हिवाळ्यात व नागपूरमध्ये हिवाळ्यात बर्यापैकी थंडी असते. एक जमेची बाब होती ती म्हणजे मी त्या चोरलेल्या पैशांचा गैरवापर करत नव्हतो. त्यांचा वापर मी कधीच वाम मार्गी लागण्यासाठी पण केला नाही. घरच्यांनी चोप दिल्यामुळे किंवा स्वतःची चूक समजल्याने म्हणा त्यानंतर माझी चोरी करण्याची सवय मात्र तुटली. पण घरच्यांनी म्हणजेच माझ्या आई-बाबांनी प्रेमापोटी जर मला चोप दिला नसता किंवा जाब विचारला नसता आणि आपलाच मुलगा आहे म्हणून सोडून दिलं असतं तर कदाचित माझा चोरी करण्याचा आत्मविश्वास आणखी वाढला असता आणि समोर जाऊन मी एखादा मोठा चोर किंवा दरोडेखो...