या धकाधकीच्या आणि प्रचंड स्पर्धा असलेल्या जगात आपण काय करतोय ? का करतोय ? आणि आपल्या कृतीचा स्वतःवर आणि समाजावर काय परिणाम होतोय याबद्दल विचार करायला वेळचं उरत नाही . त्यामुळे आपल्या शिक्षणाचा आणि विकासाचा उपयोग हा बऱ्याचदा विविध स्वरूपातील वर्गवारीला बळकटचं करण्या करीता होत असतो . जवळपास दहाएक वर्षाआधी आमिर खान एका घड्याळीच्या जाहिरातेत खुद्द एका मोठ्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) असून सुद्धा संगणक दुरुस्ती चे सोपी आणि सामान्य काम हसत हसत करतो आणि त्याबद्द्दल विचारपूस केल्यावर तो म्हणतो कि " काम लहान किंवा मोठ नसतं , काम तर काम असतं ." आणि त्यासाठी बराच भाव खाऊन जातो . पण वास्तव हे आहे काय ? तर कदाचित याचे उत्तर सगळ्यांचा तोंडून नाही असेच निघेल . माझे काम , माझा व्यवसाय आणि माझे क्षेत्र कशाप्रकारे महत्त्वाचे आहे आणि माझ्या किंवा माझ्या कामाच्या अनुपस्थितीमध्ये जगाचा गाडाचं चालणार नाही य...