Skip to main content

Posts

Showing posts from 2026

सावजी रस्सा

“नागपूर मधे अस्सल सावजी कुठे मिळते ?” हा नागपूर भ्रमंती वर असलेल्या बहुतांश लोकांचा अगदी ठरलेला प्रश्न आहे. त्यात आणखी भर म्हणजे बऱ्याच लोकप्रिय वायरल इंस्टाग्राम रिल्सच्या प्रभावामुळे सावजीच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली. झणझणीत तिखट रस्यासोबत मासाहर, पाटवडी आणि सोबत भाकरी याचे बरेच शौकीन आहेत. नागपूरच्या बाहेरील लोकांना नागपूरकर इतके तिखट आणि मसालेदार अन्न कसे पचवत असतील याबद्दल नेहमी कुतुहूल असते. २०२५ साली सिंगापूरमध्ये एका आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवात नागपूरच्या सावजी पाककृतीचे कौतुक झाले होते. सावजी आणि नागपूर जणू काही आता एका नाण्याचा दोन बाजू झाल्या आहेत. पण अगदी 150 वर्षाआधी सावजी नावाच्या पाककृतीचे आणि नागपूरचे दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हते. आज सावजी खाणे म्हणजे मेजवानी, काही तरी विशेष याउलट सावजी पाककृतीचा उगम झाला तो म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षेला पूर्ण करण्यासाठी. कामगार वर्गाच्या कल्पकतेतून आणि प्रसंगावधेतून निर्माण झालेली पाककृती म्हणजे आजची आपली किंवा आपला सावजी. 1877 साली जमशेदजी टाटांनी नागपूर शहरात शुक्रवारी तलावाच्या बाजूला एम्प्रेस मिल उभारली. विदर्भात मोठ्या प्र...

संरक्षित जंगल, असुरक्षित माणूस

2014 साली मी चंद्रपूर च्या ताडोबा अभयारण्यात वाघ बघायला गेलो होतो. गब्बर नावाचा वाघ छोट्या पाण्याचा डोहात शांतपणे बसून होता. सुरुवातीच्या 4-5 मिनिटांत माझ्या मधे असलेली नैसर्गिक अधिवासात वाघाला बघण्याची उत्सुकता थोड्या प्रमाणात कमी झाल्यानंतर माझा मेंदू गब्बर ला सोडून परिसरातील आजूबाजूच्या बाबींची सुद्धा नोंद घ्यायला लागला आणि अगदी थोड्याच वेळात मला गुन्हेगार असल्यासारखं वाटायला लागल. एका वाघाला बघायला जवळपास चाळीस-पन्नास सफारीच्या गाड्या होत्या अणि प्रत्येक गाडी वाघाची एखादी छान फोटो घेण्याचा नादात एकमेंकावर चढाओढ करून गब्बर च्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होत्या. करिश्माई किंवा आकर्षक प्राण्याच्या यादीत असल्याने आणि अन्न साखळीच्या अगदी शीर्षस्थानवर असल्याने वाघाच्या संवर्धनात आणि त्याला बघण्यात आपण नेहलीच अग्रेसर असतो. यामुळेच गेल्या काही वर्षात वाघांची संख्या वाढत आहे आणि सोबतच आपल्या नागपूरचा रुबाब सुद्धा नागपूर हे जगातील कदाचित एकमेव शहर असेल ज्याच्या शंभर किलोमीटर परिसरात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. पेंच नागपूर जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरच आहे. बोर अवघ्या पंचावन्न किलोमीटरवर. उमरे...

संत्रा नगरीची तहान

महाराष्ट्राच्या बाहेर मी नागपूरचा आहे अस सांगितल की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे “संत्री वाले नागपूर, बरोबर ?”. संत्रा नगरी किंवा ऑरेंज सिटी हे नागपूचे टोपणनाव सहज लागलेलं नाही. नागपूर शहर हे नाग नदीवर वसल्याने त्याचे नाव नागपूर पडल्याची परंपरा मानली जाते, आणि याच नागपूरची ओळख पुढे संत्र्यांशी इतकी घट्ट जोडली गेली की “संत्री” शहराचं प्रतीक बनलं. अठराव्या शतकात भोसले राजवटीत नागपूर आणि विदर्भाच्या काही भागात संत्र्यांची लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. काळ्या मातीचा ओलावा टिकून ठेवणाच्या गुणधर्म, येथील हवामान आणि बाजाराची पार्श्वभूमी यांमुळे संत्री नागपुरात रुजली आणि इतकी की नागपूरचे पर्यायी नाव संत्रा नगरी झाले. समोर जाऊन सन २०१४ मध्ये नागपूरच्या संत्र्याला भौगोलिक नामांकन (Geographical Indication tag) मिळाल आणि “नागपुरी संत्री” ही ओळख अधिकृत झाली. शहराचं नाव, आपली बाजारपेठ आणि संत्र्याच्या बागा, या तिन्ही गोष्टी संत्र्याशी एकरूप झाल्या. आपल्या नागपुरी संत्र्याची ताकद आपल्या आगळ्या वेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. नागपूर आणि विदर्भाच्या च्या उष्ण-कोरड्या हवामानात, कोरडवाहू आणि काही...

पांढरे सोन शेतापासून ताटापर्यंत

नागपुरातील “कॉटन मार्केट” किंवा “महात्मा फुले मार्केट” हे विदर्भातील भाजीपाला विक्रीचे एक ऐतिहासिक ठिकाण किंवा बाजारपेठ. १८६१ मधे सुरू झालेल्या अमेरिकेतील “सिविल वॉर” मुले इंग्लडमधे कच्चा माल म्हणजे कापसाचा तुटवडा निर्माण झाला. परिणामी ब्रिटिश सरकारने कापसाच्या आयातीसाठी नागपूर ला प्राधान्य दिले आणि शुक्रवारी किंवा जुम्मा तलावाच्या बाजूला संपूर्ण विदर्भातून येणाऱ्या कापसाची बाजारपेठ भरू लागली. याच बाजारपेठेला समोर जाऊन कॉटन मार्केट असे नाव पडले. आता तिथे भाजीपाला विकला जातो, आणि एकेकाळी याच बाजारपेठेतून संपूर्ण विदर्भाची अर्थव्यवस्था चालत होती. नागपूर महानगर पालिकेच्या दस्तावेजनुसार १९२५ साली ७५,००० हून जास्त बैलगाड्या विदर्भातून कापूस विकायला नागपूरला आल्या होत्या. ब्रिटिश काळातील गॅझेट्स नुसार नागपूर जिल्ह्यात ८९ जिनिंग कंपन्या, आणि १,०६५ छोट्या-मोठ्या जीन होत्या. नागपूर मधे प्रक्रिया होणाऱ्या कापूस आयातीसाठीच नागपूर-मुंबई लोहमार्ग ब्रिटिशांनी सुरू केला. १८७७ साली टाटा समूहाने नागपूर मधे एम्प्रेस मिल सुरू केली, ही भारतातील पहिल्या कापड गिरण्यांपैकी एक. कापसापासून धागा आणि मग धाग्य...