महाराष्ट्राच्या बाहेर मी नागपूरचा आहे अस सांगितल की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे “संत्री वाले नागपूर, बरोबर ?”. संत्रा नगरी किंवा ऑरेंज सिटी हे नागपूचे टोपणनाव सहज लागलेलं नाही. नागपूर शहर हे नाग नदीवर वसल्याने त्याचे नाव नागपूर पडल्याची परंपरा मानली जाते, आणि याच नागपूरची ओळख पुढे संत्र्यांशी इतकी घट्ट जोडली गेली की “संत्री” शहराचं प्रतीक बनलं. अठराव्या शतकात भोसले राजवटीत नागपूर आणि विदर्भाच्या काही भागात संत्र्यांची लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. काळ्या मातीचा ओलावा टिकून ठेवणाच्या गुणधर्म, येथील हवामान आणि बाजाराची पार्श्वभूमी यांमुळे संत्री नागपुरात रुजली आणि इतकी की नागपूरचे पर्यायी नाव संत्रा नगरी झाले. समोर जाऊन सन २०१४ मध्ये नागपूरच्या संत्र्याला भौगोलिक नामांकन (Geographical Indication tag) मिळाल आणि “नागपुरी संत्री” ही ओळख अधिकृत झाली. शहराचं नाव, आपली बाजारपेठ आणि संत्र्याच्या बागा, या तिन्ही गोष्टी संत्र्याशी एकरूप झाल्या. आपल्या नागपुरी संत्र्याची ताकद आपल्या आगळ्या वेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. नागपूर आणि विदर्भाच्या च्या उष्ण-कोरड्या हवामानात, कोरडवाहू आणि काही भागांत उपलब्ध असलेल्या बाराही महिने भुजलामुळे आंबिया आणि मृग अश्या दोन बहरावर संत्र्याची एक फळ म्हणून अन्न-साखळी, मूल्य साखळी आणि बाजारव्यवस्था उभी राहिली. त्यामुळे आज ऑरेंज सिटी हे नाव फक्त एक ओळख नसून, ते एका विशिष्ट परिस्थितीचं फलित आहे. पण ही ओळख आज हळू हळू बदलायला लागली आहे आणि या बदलाच सर्वात मोठ संकेत आहे ते म्हणजे, पाण्याची टंचाई आणि भुजलाची खाली गेलेली पातळी. नागपुरी संत्र्याची आणखी एक विशेषता म्हणजे संत्र्यात असणाऱ्या बिया आणि तंतूमध्ये लिमोनिन नावाचा एक घटक असतो जो आपल्या संत्र्याला एक कडू चव देऊन जाते, त्यामुळे रसाच्या किंवा इतर स्वरूपात संत्र्याचे इतर खाद्यपदार्थांमध्ये रूपांतर होऊ शकले नाही. म्हणूनच नागपुरी संत्री ही फक्त फळाच्या रूपात खाण्यापुरती मर्यादित राहिली.
संत्रा या फळासाठी पाणी हा अतिमहत्त्वाचा घटक आहे. संत्र्याची बाग ही पाण्याशिवाय जिवंत राहू नाही. बोअरवेल, विहिरी, सूक्ष्मसिंचन, पावसाचं साठवण, जमिनीत मुरणं या सगळ्यावर संत्र्याच उत्पादन अवलंबून असते.पण संपूर्ण विदर्भात भुजलाची पातळी निच्चांक गाठत आहे, अनेक ठिकाणी विहिरी, बोड्या, तळे आणि बोअरवेल कोरडे पडले आहेत. काही ठिकाणी हजार फूट खोल बोअरवेल करून सुद्धा पाणी लागत नाही आहे आणि परिणामी सिंचन कमी होऊन बऱ्याच शेतकऱ्यांनी संत्र्याच्या बागा काढून घ्यायला पसंती दिलेली आहे. २०१८ मध्ये पाणी टंचाई ला बघून नागपूरच्या संत्र्याच्या उत्पादनात घट होईल असे भाकीत करण्यात आले होते, आज त्याच इशाऱ्याचं वास्तव समोर येत आहे. ज्या भू-परिस्थितीने नागपुरी संत्र्याला जन्म दिला, तीच आज बदलते आहे. पाणी टंचाई आणि अनियमित हवामानामुळे झालेला ताण अधिक घातक होतो आणि संत्र्याची प्रतिकार क्षमता कमी होते. या बदलाचा सर्वात मोठा संकेत म्हणजे आज विदर्भातील संत्र्याचे बगीचे निंबूवर्गीय हरित रोगाच्या छायेत आहे. सुमारे ७२,००० हेक्टर वर असलेले लिंबूवर्गीय पिके या रोगाने प्रभावित झाल्याची नोंद आहे, आणि एकूण उत्पादनात ३०–४० टक्के घट झाल्याचाही नोंद आहे. पण निंबूवर्गीय हरित रोग(HLB) फक्त रोग म्हणून येत नाही, तो झाडाला पाणी कमी मिळल्यावर येतो. म्हणजे रोग आणि जलताण हे एकमेकांचे साथीदार आहेत.
२०२४ हे साल तर संत्र्यासाठी अधिक कठोर ठरलं. उबदार हिवाळा, अनियमित पाऊस या सगळ्याने संत्र्याच्या उत्पादनाला मोठा धक्का बसला. काही अहवालांनुसार नुकसान हे तब्बल ५० लाख टनांपर्यंत गेलं, आणि शेतकऱ्यांना अपेक्षित ४०–५० प्रति किलोच्या तुलनेत केवळ १०–१५ प्रति किलो दर मिळाला. उत्पादन कमी, दर कमी, झाडांची प्रतिकार शक्ती कमी, अश्या परिस्थितीत बगीचा टिकवणं म्हणजे केवळ शेती कारणे नाही ती अस्तित्वाची लढाई बनते.
या पानीटांचाईचा आणि हवामान बदलाचा परिणाम फक्त शेतात आणि शेतकऱ्यांवर होतो का, तर नाही. संत्री हा विदर्भाच्या हंगामी आहाराचा, फळबाजाराचा आणि पोषणाच्या स्थानिक उपलब्धतेचा एक महत्तव्वाचा भाग आहे. जर पाण्याचा टंचाळीमुळे किंवा हवामान बदलामुळे उत्पादन कमी कमी झालं की संत्री महाग होतात, दळणवळण आणि साठवणुकीचा खर्च वाढतो, एकूणच संत्री खराब व्हायच प्रमाण वाढतं, आणि आपल्याला मिळणारी ताजी फळं अनियमित होत जातात. म्हणजेच संत्रा या पिकावरचे संकट म्हणजे आपल्या अन्न आणि पोषण सुरक्षेला सुद्धा धोक्यात टाकते आणि आपली वर्षानुवर्षे चालत आलेली स्तानिक अन्नप्रणालीसुद्धा धोक्यात येते.
याच काळात संत्रा लागवडीच्या क्षेत्रात सुद्धा बदल होतो आहे. विदर्भात आता संत्र्याचे उत्पादन अमरावती कडे झुकत असल्याचे पुरावे आहेत. एक अभ्यासानुसार विदर्भातील संत्रा उत्पादनात 37.36 टक्के वाटा हा अमरावती चा असून नागपूरचा वाटा 23.87 टक्के आहे. जुने अभ्यास आणि दस्तावेज अमरावती मध्ये मोठ्या प्रमाणावरसंत्र्याचे उत्पादन आणि लागवड झाल्याचं दाखवतात. 2006–07 साली अमरावती मध्ये 67,057 हेक्टरवर 2,88,000 टन संत्र्याचे उत्पादन नोंदवलं गेलं होतं. याचा अर्थ नागपूरची ओळख जरी संत्रा नागरी म्हणून होतो, तरी संत्र्याचा प्रत्यक्ष उत्पादन-आर्थिक केंद्रबिंदू आता अमरावती कडे सरकला आहे. राष्ट्रीय पातळीवरही संत्र्याचे स्वरूप बदलत आहे. आज नागपूरला नागून असलेले मध्य प्रदेश हे राज्य आज संत्री उत्पादनात खूप पुढे आलं आहे. शासकीय अधिकृत दस्तऐवजांमध्येही मध्यप्रदेशातील संत्रा उत्पादनात छिंदवाडा, पांढुरना, राजगड यांसारख्या जिल्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे आता संत्रा उत्पादनांची आर्थिक आणि भौगोलिक रचना आता नागपूर-केंद्रित उरलेली नाही. नागपूरचे संत्रा नागरी म्हणून बिरुद जरी टिकून असले, पण प्रत्यक्ष संत्री हे पीक इतर भागात पाय रोवत असून पाण्याची उपलब्धता संत्रच्याचे लागवडीचे क्षेत्र ठरवत आहे.
संत्रा उगवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पाण्याची टंचाई आणि हवामान बदल पिकविमा, कर्ज आणि अनिश्चित उत्पन्नाच्या रूपाने पुढे येतं. म्हणजे पर्यावरणीय संकट, बाजारातील अस्थिरता आणि संस्थात्मक दुर्बलता या तिन्हींचा दबाव एका संत्र्याच्या बागेवर येतो, पण सरतेशेवटी या सगळ्याच्या मुळाशी पाणीच आहे. पाणी असेल तर रोगराई कमी फोफावते, झाडं ताणमुक्त राहतात, उत्पादन टिकतं, संत्रा बाजारात खेळतो, बहुतांश लोकांना खायला मिळतो, पण पाणी नसेल तर बाकी सर्व उपाय अपुरे ठरतात. त्यामुळे नागपूरची “संत्रा नागरी” ही ओळख जपायची असेल, तर पाण्याला फक्त सिंचनाचा आणि शेतीचा एक घटक न पकडता आपल्या अन्न प्रणालीचा केंद्रबिंदू मानावं लागेल. पाणलोट क्षेत्राचे पुनरुज्जीवन, शेत तळे, लघू सिंचन, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर , भूजल आधारित पिकांची आखणी, लवचिक पीक विमा योजना या सर्वांची सांगड घालणे आवश्यक आहे. अन्यथा नागपुरी संत्र्याचा पट्टा टिकणार नाही; टिकलाच तरी फक्त नवापूरता
नागपुरी संत्री हे केवळ एक फळ नसून नागपूरकराची शान आहे, ग्रामीण भागाचे अर्थकारण आहे, आणि हंगामी पोषणावर आधारित अन्न प्रणाली आहे. त्यामुळे ही ओळख जपायची असल्यास, आधी पाणी वाचवावं लागेल. कारण पाणी गेलं, तर संत्रा जातो, संत्रा गेला की बाजारपेठ जाते, आणि बाजारपेठ गेली की संत्रा नागरी ही इतिहासात जमा होईल.
Loksatta Link
I come from a group where people are very much sensitive about society, its various issues like inequality, injustice. Among us many are liberals, thinkers, activists, social workers, change makers (at least we proclaim ourselves to be such). We discuss about great people and their thoughts about society and injustice like Gandhi, Tagore, Che Guevara, Fidel Castro, Ambedkar, Savarkar, Buddha, Govind Pansare, Karl Marx, Vinoba . Still we find it very difficult to understand what does the term "injustice" actually mean ? Does it come with a tag "conditions apply" ? Can I fudge the definition of injustice as per my comfort zone ? Can I differentiate the injustice happening in Africa from the injustice happening in Asia ? Can I make a big bubble of injustice to glorify my work ? Is injustice restricted to very few domains ? Why does each of us try to be a shining example of a true justice provider ? Is injustice an optional thing, which can be used according...

Comments
Post a Comment