Skip to main content

Posts

Showing posts with the label Truth

सत्यगाथा

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका भारतीय कलाकाराचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळलेले नाही. तेव्हापासून संपूर्ण भारताला किंवा भारतातील माध्यमांना फक्त आणि फक्त त्या घटनेचे वेध लागलेले दिसत आहेत. त्या घटनेनंतर कोरोंना ,  पुरस्थिती , बेरोजगारी , डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी बरीच संकटे सतत भारताला प्रश्न विचारात आहे. इतके असूनही अपवाद एक दोन माध्यमे सोडली तर कुणीच या खर्‍या प्रश्नांबद्दल बोलत नाही आहे. हा जोमात सुरू असलेला खेळ सर्वांनाच माहिती आहे , तरी मी हे लिहिण्याचा खटाटोप का करतोय हे बघूया. महात्मा गांधीजींचे तीन माकड हे भारतात बरेच प्रसिद्ध आहे. या तीन माकडांपैकी एकाने त्याचे डोळे झाकलेले आहे , दुसर्‍याने कान झाकलेले आहे तर तिसर्‍याने तोंड झाकलेले आहे. या तीन माकडांच्या तत्वज्ञानाचे मूळ जपान या देशातील आहे. साधारण १७ व्या शतकापासून या तत्वज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय. हे उदाहरण “वाईट बघू नका , वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका” अशी शिकवण देते. शांतता आणि सहनशीलतेच्या प्रचारात या तत्वज्ञानाचा महात...

सकाराम-नकाराम

आपण सतत-सतत गोड पदार्थ खात असलो की लवकरच आपल्याला गोड पदार्थांचा वीट येतो आणि ते येणं अगदी साहजिक आहे. मग यावर उपाय काय तर आपण झणझणीत तिखट खातो आणि चव बदलण्याचा प्रयत्न करतो. हिच परिस्थिती सध्या आपल्या समाजाची होऊन बसली आहे , अक्षरषा समाजातील बहुसंख्य लोकांना गोड-गोड बोलण्याचा पुळका आलेला आहे. म्हणजे काय तर समाजातील आणि अवतीभवती होणार्‍या फक्त “सकारात्मक” गोष्टींकडेच लक्षं द्यायचं किंवा दखल घ्यायची आणि बाकी गोष्टी जणू अस्तित्वातच नाही आहे हे धरून चालायच. या लेखमालेच्या सुरूवातीच्या “समाजातील वर्गवारीवर प्रकाशझोत टाकण्याची गरज” या लेखात नमूद केल्याप्रमाणे असं हे सकारात्मक-सकारात्मक किती दिवस चालेल आणि अश्या या प्रवृत्तीमुळे समाजाचे किंवा आपले वैयक्तिक किती भले होईल ? किंवा फक्त सकारात्मक बाबींकडेच लक्ष दिल्या गेलं तर नकारात्मक बाबींमध्ये अडकलेले लोकं आणि त्यांच्या प्रश्नांच काय होईल ? उदाहरणार्थ मला अभ्यासक्रमात भूगोल , गणित , विज्ञान आणि इतिहास हे चार विषय आहेत. या चार दिलेल्या विषयापैकी भूगोल , इतिहास आणि विज्ञान या तीन विषयात मला नेहमी छान गुण पडतात म्हणजेच ही झाली...