Skip to main content

Posts

Showing posts with the label Livelihood

सावजी रस्सा

“नागपूर मधे अस्सल सावजी कुठे मिळते ?” हा नागपूर भ्रमंती वर असलेल्या बहुतांश लोकांचा अगदी ठरलेला प्रश्न आहे. त्यात आणखी भर म्हणजे बऱ्याच लोकप्रिय वायरल इंस्टाग्राम रिल्सच्या प्रभावामुळे सावजीच्या प्रसिद्धीत आणखी भर पडली. झणझणीत तिखट रस्यासोबत मासाहर, पाटवडी आणि सोबत भाकरी याचे बरेच शौकीन आहेत. नागपूरच्या बाहेरील लोकांना नागपूरकर इतके तिखट आणि मसालेदार अन्न कसे पचवत असतील याबद्दल नेहमी कुतुहूल असते. २०२५ साली सिंगापूरमध्ये एका आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवात नागपूरच्या सावजी पाककृतीचे कौतुक झाले होते. सावजी आणि नागपूर जणू काही आता एका नाण्याचा दोन बाजू झाल्या आहेत. पण अगदी 150 वर्षाआधी सावजी नावाच्या पाककृतीचे आणि नागपूरचे दूरदूरपर्यंत काहीच संबंध नव्हते. आज सावजी खाणे म्हणजे मेजवानी, काही तरी विशेष याउलट सावजी पाककृतीचा उगम झाला तो म्हणजे अन्न आणि पोषण सुरक्षेला पूर्ण करण्यासाठी. कामगार वर्गाच्या कल्पकतेतून आणि प्रसंगावधेतून निर्माण झालेली पाककृती म्हणजे आजची आपली किंवा आपला सावजी. 1877 साली जमशेदजी टाटांनी नागपूर शहरात शुक्रवारी तलावाच्या बाजूला एम्प्रेस मिल उभारली. विदर्भात मोठ्या प्र...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...

प्रगतीच्या वाटा.

साल २०१३ पासून विकास या शब्दाचा उपयोग आपल्या देशात बराच होताना दिसतोय. २०१४ ची पूर्ण लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा या दोन्ही निवडणूका एका मोठ्या पक्षाकडून विकास हा मुद्दा घेऊनच लढल्या गेल्या. "सबका साथ , सबका विकास" हा नारा देऊन भारतीय जनता पक्षाने दोन्ही कडे मोठा विजय संपादित केला. अर्थातच विकास किंवा प्रगति या मुद्द्यावर निवडणूक लढणे ही लोकशाही साठी जमेची बाब आहे. सगळ्यांचा विकास होईल हे नक्कीच छान आहे , आणि त्याची गरज सुद्धा आहे. पण भारतासारख्या   वैविध्यपूर्ण देशात सर्व लोकांचा विकास हा सारखाच असणे अपेक्षित नाही अथवा प्रदेशानुसार आणि लोकांनुसार विकासाचे स्वरूप हे नक्कीच वेगळे असणार. त्यामुळे लोकांची गरज काय आहे याचा विचार न करता आपल्या प्रस्थापित विकासाच्या परिभाषा आणि विकास त्यांचावर लादणे हा एक प्रकारचा अन्यायच असेल. माणसाचा विकास म्हणजे नेमके काय ? संयुक्त राष्ट्राच्या विकास कार्यक्रमाच्या(युनायटेड नेशन्स डेवलपमेंट प्रोग्राम) मानवी विकासाच्या परिभाषेत अर्थव्यवस्थेच्या एकंदर वाढीला प्राध्यान न देता मानवी जीवन कितपत समृद्ध आहे याला महत्त्व दिले आह...

वाघ एके वाघ.

बाबाराव , गेल्या ४ - ५ वर्षांपासून २मुख्य समस्यांनी ग्रासलेले आहे . पहिली समस्या म्हणजे जंगली जनावरांचा वाढत त्रास आणि दुसरी म्हणजे नाईलाजाने / बळजबरीने करावे लागणारे स्थलांतर . बाबाराव वर्धा जिल्यातील बोर जंगलाजवळ आमगाव जंगली या गावात गेल्या कित्येक पिढ्यांपासून वास्तव्यास आहे . नंदा गवळी या समाजाचे असल्याने गायी - म्हशी पाळणे हा त्यांचा पारंपरिक आणि मुख्य व्यवसाय . गावालगतच कुरण आणि जंगल यावर गाई - म्हशी साठी लागणाऱ्या चाऱ्याची मदार . त्यामुळे जंगलात गावातील लोकांचा आणि पशूंचा नेहमीच वावर असायचा . जंगलाचे संवर्धन हे गावपातळीवर सामूहिकरत्या व्हायचे . तेव्हापण जंगलात वाघ आणि इतर पशु होतेच , त्यांचा जन्म काही आता आरक्षित जंगल घोषित झाल्यानंतर नाही झाला . तरीपण याआधी बाबारावला   अश्या प्रकारची निसर्गाची किंवा नैसर्गिक साधनसंपत्तीची वर्गवारी कधीच आढळली नाही . सध्यस्थितीत जंगल आणि वाघाच्या संवर्धनाच्या नावाखाली जो काही घोळ सुरु आहे यावर बाबाराव ला हसावे कि रडावे हेच ...