गेल्या काही वर्षापासून लोकांचा किंवा कमीत कमी भारतीय लोकांचा तरी कल हा विशिष्ट प्रकारच्या होणार्या घटनांच्या( Events ) बाजूने जास्त दिसतोय , आणि हा प्रकार चोहीकडे आहे. सरकारी प्रणाली , खाजगी कंपनी , निवडणुका , सामाजिक संस्था आणि इतरत्रही , जणूकाही समाजाला मोठमोठ्याला सतत होणार्या घटनांची भूल पडली आहे किंवा सवय झाली आहे. घटना (Event) ही एका विशिष्ट मर्यादित वेळेला घडते आणि त्यातून काही तरी अपेक्षित असतेच असे नाही. बर्याचदा काहीही समोर मागे नसतांनाही घटना घडवल्या जातात किंवा साजर्या केल्या जातात. मागील कित्येक वर्षापासून कुठल्या तरी प्रक्रियेचा भाग म्हणून किंवा प्रक्रियेचे फलित म्हणून घटना घडायच्या किंवा साजर्या केल्या जायच्या , त्यामुळे त्यामागे काही कारणे असायची , त्यातून काही तरी अपेक्षित असायचे. पण आता असे दिसत नाही प्रक्रियेला डावलून उथळ घटनांना जास्त महत्व दिले जात आहे त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेमुळे सुटणारे प्रश्न किंवा प्रक्रियेमुळे वाढणारी क्षमता आणि होणारी प्रगती हे होताना दिसत नाही. पण प्रक्रियेतील प्रश्नांचे किंवा समस्यांचे भांडवल करून घटनेला भव्य-दिव...