Skip to main content

Posts

Showing posts with the label superhero

हिरोपंती

दिवसेंदिवस माणसाचे जीवन खूप सोयिस्कर होत चालले आहे. जवळपास सर्वच गोष्टी अगदी सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने पूर्वी विविध प्रकारच्या कामातील रोमांच आता अनुभवता येत नाही. त्यामुळे तो रोमांच आपण चित्रपट किंवा संगणकीय खेळांमध्ये शोधत असतो. संगणकीय खेळांचा प्रसार हा विशिष्ट वयोगटांत मर्यादित असतो . पण चित्रपटाचे तसं नाही , अगदी लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सर्वच लोकं चित्रपट बघत असतात. म्हणूनच चित्रपट आणि चित्रपटसृष्टी हे आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीतरी आपण एखादा तरी चित्रपट बघतोच. आजकाल भारतीय चित्रपट किवा इतर चित्रपट सुद्धा बर्‍यापैकी व्यावसायिक झालेले आहे. त्यामुळे त्यात सत्याचा असत्यावर विजय , न्यायाचा अन्यायावर विजय , प्रचंड मारामारी वगैरे याप्रकारचे चित्रपट भरपूर बनवले जातात. याप्रकारचे चित्रपट बघतांना बहुधा आपण सर्वच श्रोते सत्याची किंवा न्यायाची बाजू घेतो आणि नायक कश्याप्रकारे खलनायकावर मात करू शकतो याबद्दल सारखा विचार करत असतो. बहुधा नायकाची किंवा सत्याची बाजू घेण्याचा कुठलाच संबंध हा श्रोत्यांच्या व्यक्तिमत्वाशी दिसून येत...