गेल्या सदरात काम आणि काम करण्याचा पद्धतीमध्ये कश्याप्रकारे नीती आणि मूल्यांची सोयीस्कर सांगड घालून काही विशिष्ट कामे हि अति महत्त्वाचे आणि बाकी सारे दुय्यम अशी वर्गवारी तयार करण्यात आली आहे किंवा घडलेली हे आपण बघितलं , हि वर्गवारी तर कामाकडे बघणाच्या दृष्टिकोनातून घडलेली आहे. पण हे इथेच थांबते काय तर मुळीच नाही. कामाची परिभाषा , कौशल्य आणि काम करून मिळणार मोबदला यात पण वर्गवारी आहेच. कामाच्या मोबदल्यात मिळणाऱ्या देयकांबद्दल बोललं तरी जाते पण कौशल्य आणि कामाची परिभाषा याबद्दल फारसा कुणी विचार करताना दिसत नाही , आणि याबद्दल भविष्यात पण फार काही होईल असे चित्र सध्या तरी दिसत नाही आहे. वर्गवारिचे नुकसान सोसनाऱ्या वर्गाला बहुतेकदा याबाद्द्दल माहिती नसते आणि असली तरी अन्न , वस्त्र , निवारा , शिक्षण या मूलभूत गरज पूर्ण करण्यातच त्यांचा बराचसा वेळ आणि ऊर्जा निघून जाते. ज्यांना खरोखर वर्गवारीबद्दल माहिती असते त्यांना बहुतेकदा वर्गवारीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या फायदाच होत असतो म्हणून तो स्वतः असलेल्या सोयीस्कर वर्गात खिंडार पाडू इच्छित नाही. परिणामी हि वर्गवारी अशीच ब...