Skip to main content

Posts

Showing posts with the label Class

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

ठपकेबाजी

गेल्या ७ महिन्यात वेगवेगळ्या सदरामध्ये आपण समाजात असलेल्या विविध प्रकारच्या वर्गवारीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रमाण , गुणधर्म , समाजावर होणारे परिणाम या बाबींचा पण विचार करण्यात आला. याप्रकारच्या वर्गवार्‍या भूतकाळात पण होत्या आणि त्या भविष्यकाळात पण राहणारच. त्यांना ओळखणे , त्याबद्दल विचार करणे आणि चर्चा घडवून आणण्याचे धाडस आपण अंगीकृत करणे ही काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्या सतत प्रयत्नांनी आपण त्यांची तीव्रता आणि त्यांच्या होणार्‍या परिणामांवर मात्र थोडं का होईना आळा घालू शकतो. आता चालू असलेल्या दशकामध्ये भारत देशाने आणि भारतातील जनतेने अनेक प्रकारचे चढ-उतार       (बहुतेक टोकाचे) बघितलेले आहे. यात सामाजिक , आर्थिक , धार्मिक , वैयक्तिक , शैक्षणिक , सांप्रदायिक ,   इतर जटिल व न दिसणार्‍या बाबींचा पण समावेश आहे. मागील काही वर्षापासून एक वर्गवारी (तशी जुनीच) नव्याने वर डोक काढत आहे. ती वर्गवारी म्हणजे , समाजातील लोकांना आपल्या पूर्वग्रहीत विचारांमुळे सोयीस्कर अशे ठपके लावणे व या ठपक्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी ...

“शिक्षणवारी”

मी मुख्य नागपुर शहरापासून दहाएक किलोमीटर दूर राहतो आणि हे अंतर तसं बघितलं तर फार नाही आहे. अगदी माझ्या बालपणापासून दळणवळणाची साधने पण मुबलक प्रमाणात उपलब्ध होती. आधी एसटीचा लाल डब्बा , नंतर स्टार बस व सोबतीला आटोरिक्षा यांची बरीच रेलचेल सुरुवातीपासूनच असायची. अंतराबद्दल बोलायच झालं तर नागपूरमधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय माझ्या घरापासून अगदी ८०० मीटर अंतरावर आहे , वैद्यकीय महाविद्यालय ५ किंलोमीटर अंतरावर आहे आणि राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालय हे ८ किलोमीटर अंतरावर आहे. ही सगळी अंतरे सांगण्यामागचे कारण असे  की ही वेगवेगळी अंतरे आपल्याला फार वाटत नाही आणि इतक्या कमी अंतरामुळे उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये खूप काही फरक पडणार नाही असा बहुतेकदा आपला समज असतो. दहावीचा निकाल हातात येईपर्यंत डॉक्टर व्हायच असेल तर अकरावी ला प्रवेश घ्यायचा आणि अभियांत्रिकीकडे जायच असेल तर तंत्रविद्यानिकेतन( Polytechnic) ला प्रवेश घ्यायचा यापलीकडे काहीच माहित नव्हतं. अभियांत्रिकी ला राज्यस्तरीय महाविद्यालये वेगळे , राष्ट्रस्तरीय वेगळे आणि नंतर आई.आई.टी( IIT) वेगळे आणि...

सकाराम-नकाराम

आपण सतत-सतत गोड पदार्थ खात असलो की लवकरच आपल्याला गोड पदार्थांचा वीट येतो आणि ते येणं अगदी साहजिक आहे. मग यावर उपाय काय तर आपण झणझणीत तिखट खातो आणि चव बदलण्याचा प्रयत्न करतो. हिच परिस्थिती सध्या आपल्या समाजाची होऊन बसली आहे , अक्षरषा समाजातील बहुसंख्य लोकांना गोड-गोड बोलण्याचा पुळका आलेला आहे. म्हणजे काय तर समाजातील आणि अवतीभवती होणार्‍या फक्त “सकारात्मक” गोष्टींकडेच लक्षं द्यायचं किंवा दखल घ्यायची आणि बाकी गोष्टी जणू अस्तित्वातच नाही आहे हे धरून चालायच. या लेखमालेच्या सुरूवातीच्या “समाजातील वर्गवारीवर प्रकाशझोत टाकण्याची गरज” या लेखात नमूद केल्याप्रमाणे असं हे सकारात्मक-सकारात्मक किती दिवस चालेल आणि अश्या या प्रवृत्तीमुळे समाजाचे किंवा आपले वैयक्तिक किती भले होईल ? किंवा फक्त सकारात्मक बाबींकडेच लक्ष दिल्या गेलं तर नकारात्मक बाबींमध्ये अडकलेले लोकं आणि त्यांच्या प्रश्नांच काय होईल ? उदाहरणार्थ मला अभ्यासक्रमात भूगोल , गणित , विज्ञान आणि इतिहास हे चार विषय आहेत. या चार दिलेल्या विषयापैकी भूगोल , इतिहास आणि विज्ञान या तीन विषयात मला नेहमी छान गुण पडतात म्हणजेच ही झाली...