Skip to main content

ठपकेबाजी

गेल्या ७ महिन्यात वेगवेगळ्या सदरामध्ये आपण समाजात असलेल्या विविध प्रकारच्या वर्गवारीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रमाण, गुणधर्म, समाजावर होणारे परिणाम या बाबींचा पण विचार करण्यात आला. याप्रकारच्या वर्गवार्‍या भूतकाळात पण होत्या आणि त्या भविष्यकाळात पण राहणारच. त्यांना ओळखणे, त्याबद्दल विचार करणे आणि चर्चा घडवून आणण्याचे धाडस आपण अंगीकृत करणे ही काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्या सतत प्रयत्नांनी आपण त्यांची तीव्रता आणि त्यांच्या होणार्‍या परिणामांवर मात्र थोडं का होईना आळा घालू शकतो.

आता चालू असलेल्या दशकामध्ये भारत देशाने आणि भारतातील जनतेने अनेक प्रकारचे चढ-उतार      (बहुतेक टोकाचे) बघितलेले आहे. यात सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वैयक्तिक, शैक्षणिक, सांप्रदायिक,  इतर जटिल व न दिसणार्‍या बाबींचा पण समावेश आहे. मागील काही वर्षापासून एक वर्गवारी (तशी जुनीच) नव्याने वर डोक काढत आहे. ती वर्गवारी म्हणजे, समाजातील लोकांना आपल्या पूर्वग्रहीत विचारांमुळे सोयीस्कर अशे ठपके लावणे व या ठपक्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी करणे. प्रत्येक विभागाला एका विशिष्ट प्रकारची ओळख आणि विचारांची नेमणूक केली जाते. त्या ठराविक विचारांच्या आणि ओळखेच्या बाहेर त्यांना बोलण्याची मुभा नसते. असे केल्यास त्यांना विविध प्रकारच्या सामाजिक आक्रोशाला तोंड द्यावे लागते. याच सर्व प्रकारातून एक मोठा संच निर्माण होतो, “तुम्ही आणि आम्ही” असा.

शेती आणि उपजीविकेचा क्षेत्रात काम करत असल्याने सतत वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात व हे अनुभव बर्‍याचदा लोकप्रिय किंवा लोकांना सोयिस्कर असलेल्या मतांपासून भिन्न असतात. भारतातील शेती आणि ग्रामीण भागातील रोजगाराची स्थिति सध्या दयनीय आहे हे सर्वांना माहीतच आहे. या परिस्थितीत काही तरी सुधार व्हावा या दृष्टीने या क्षेत्रातील कार्यकर्ते सरकारच्या मागे काही मागण्या धरून लावतात, इतर लोकांना या दयनीय अवस्थेबद्दल जागरूक करतात. असाच काही प्रयत्न आदिवासी बांधवांकरिता गेल्या कित्येक वर्षापासून होतो आहे. प्रस्थापित सरकार, भांडवलदार आणि छोटे-मोठे उद्योजक या व्यवस्थेपासून आदिवासी बांधवांचे व त्यांच्या अधिकारचे संवरक्षण व्हावे, त्यांच्या जमिनी लुबाडल्या जाऊ नये म्हणून बरेच लोकं त्यांच्या बाजूने सरकारशी आणि लोकांशी सतत चर्चा करत असतात. शेतकरी, शेतमजुर किंवा आदिवासी या सर्व लोकांचे प्रश्न आपण सर्वांना माहिती आहे तरीसुद्धा आपण या लोकांच्या हक्काबद्दल काम करणार्‍या कार्यकर्त्यांना एका विशिष्ट वर्गात बसवून देतो. या वर्गाचे नाव आहे “साम्यवादी” किंवा डाव्या विचारसरणीचे लोकं. म्हणजे फक्त लोकांच्या हक्काबद्दल बोलल्याने तुमच्यावर आयुष्यभरासाठी “डावे किंवा साम्यवादी” असा ठपका लावला जातो. अगदी हाच प्रकार दुसर्‍या बाजूला पण दिसून येतो. एखाद्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीने कितीही खरी आणि तार्किक परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो उजव्या विचारसरणीचा असल्यामुळे तो मूर्खच असणार आणि त्यात काहीच तर्क नसणार असा ठपका पण आपणच लावतो. याच धर्तीवर ठपकेबाजी ही सर्वच क्षेत्रात दिसून येते. त्यामुळे एकदा कुणाला आपण ठपका लावला तर त्याचे मत आणि विचारांना क्षुल्लक ठरवण्यात आपण मोकळे.

मी ज्या क्षेत्रात काम करतो त्याचे सर्वस्वी ज्ञान आणि अनुभव मलाच आहे असा आपला समज होऊन बसतो. त्यामुळे नवीन अनुभव आणि नवीन ज्ञांनाला तिथे जागा नसते. प्रस्थापित ठपके लावणार्‍याना हे पाहिजेच असतं, कारण त्यामुळे त्यांचेच ज्ञान हे एकमेव मानले जात असते. पण या सर्व प्रकारात त्या क्षेत्राचे खूप मोठे नुकसान होते आणि परिणामी या वर्गवारीला कंटाळून बरीच लोक काम सोडून देतात.

मनुष्य हा तसा विचार करणारा प्राणी आहे (ते दिवसेंदिवस कमी होतं आहे तो एक वेगळाच विषय आहे). त्यामुळे त्याला प्रश्न पडत असतात, प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न होतो आणि आलेल्या अंनुभवातून मते बनवली जातात. ही मते घडण्यात बर्‍याच गोष्टींचा वाटा असतो. कधी कधी ही मतं पूर्वग्रह ठेऊन बनली जातात तर कधी कधी पूर्वग्रहाच्या अगदी उलट जाऊन. त्यामुळे जरी लोकं एका विशिष्ट वैचारिक किंवा इतर गटात मोडली जात असेल तरी त्यांचा मतांचा विचार व्हायलाच हवा, त्यावर चर्चा पण व्हायला हवी. हे सारखं सारखं घडत गेलं की विचारांमधील विविधतेचा स्वीकार वाढेल, लोकांमधील संवाद वाढेल व आपोआपच लोकांचे पूर्वग्रह दूर होऊन आपण मनुष्याला एक मनुष्य म्हणून बघायला सुरुवात करू.

 

Comments

Popular posts from this blog

Selective Injustice and Me !

I come from a group where people are very much sensitive about society, its various issues like inequality, injustice. Among us many are liberals, thinkers, activists, social workers, change makers (at least we proclaim ourselves to be such). We discuss about great people and their thoughts about society and injustice like Gandhi, Tagore, Che Guevara, Fidel Castro, Ambedkar, Savarkar, Buddha, Govind Pansare, Karl Marx, Vinoba . Still we find it very difficult to understand what does the term "injustice" actually mean ? Does it come with a tag "conditions apply" ? Can I fudge the definition of injustice as per my comfort zone ? Can I differentiate the injustice happening in Africa from the injustice happening in Asia ? Can I make a big bubble of injustice to glorify my work ? Is injustice  restricted to very few domains ? Why does each of us try to be a shining example of a true justice provider ? Is injustice an optional thing, which can be used according...

Cashing Demise

Asifa Bano and Dadaji Khobragade. When the heinous act happened to Asifa, whole nation felt it's grief. Everyone wanted to show dissent in one form or another, and it is needed to do so. We can't let such things get repeated every time.  Many people stood for her in different manner, some held protest some angered out through write ups, some made YouTube videos etc. Back in Nagpur the people from our group wanted to organize a protest, so I started talking to various groups and NGOs about their plans and stuff, as we thought it would be much better to have a inclusive protest rather than organizing many small protests throughout the city. To my surprise most of them didn't want to come together, everyone wanted to have it under the banner of their group or NGO. I was like "Are we doing it for the Asifa or just to hog some media coverage?" In another case, many news and entertainment portals wrote articles, did interviews, made some videos about the inhu...

संत्रा नगरीची तहान

महाराष्ट्राच्या बाहेर मी नागपूरचा आहे अस सांगितल की पहिला प्रश्न असतो तो म्हणजे “संत्री वाले नागपूर, बरोबर ?”. संत्रा नगरी किंवा ऑरेंज सिटी हे नागपूचे टोपणनाव सहज लागलेलं नाही. नागपूर शहर हे नाग नदीवर वसल्याने त्याचे नाव नागपूर पडल्याची परंपरा मानली जाते, आणि याच नागपूरची ओळख पुढे संत्र्यांशी इतकी घट्ट जोडली गेली की “संत्री” शहराचं प्रतीक बनलं. अठराव्या शतकात भोसले राजवटीत नागपूर आणि विदर्भाच्या काही भागात संत्र्यांची लागवडीला प्रोत्साहन देण्यात आले. काळ्या मातीचा ओलावा टिकून ठेवणाच्या गुणधर्म, येथील हवामान आणि बाजाराची पार्श्वभूमी यांमुळे संत्री नागपुरात रुजली आणि इतकी की नागपूरचे पर्यायी नाव संत्रा नगरी झाले. समोर जाऊन सन २०१४ मध्ये नागपूरच्या संत्र्याला भौगोलिक नामांकन (Geographical Indication tag) मिळाल आणि “नागपुरी संत्री” ही ओळख अधिकृत झाली. शहराचं नाव, आपली बाजारपेठ आणि संत्र्याच्या बागा, या तिन्ही गोष्टी संत्र्याशी एकरूप झाल्या. आपल्या नागपुरी संत्र्याची ताकद आपल्या आगळ्या वेगळ्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहे. नागपूर आणि विदर्भाच्या च्या उष्ण-कोरड्या हवामानात, कोरडवाहू आणि काही...