भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली परिस्थिती अन्न सुरक्षतेच्या बाबतीती जेमतेम होती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अन्न सुरक्षा म्हणजे सर्वाना चांगल्या दर्जाच्या अन्नाचा शाश्वत १२ महिने, वेळेवर आणि पुरेसा पुरवठा. एकूणच पुरेसा अन्नाचा साठा नसताना बफर साठा(अन्न -धान्याचा) जमा करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा पुरेसे अन्न-धान्याचे उत्पादन नसल्याने बफर साठा पण असायला हवा हा विचारच क्षुल्लक होता. प्रत्येक देश हा अन्न -धान्याचा बफर साठा साठवून ठेवत असतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात (ओला किंवा कोरडा दुष्काळ, भूकंप इत्यादी) हा साठा उपयोगात आणला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच १०-१५ वर्षांनी साठी च्या दशकात आपल्यावर उपासमारीची पाळी आली. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथे जवळपास ७०-७५% लोकसंख्या उपजिवीकेसाठी शेती वर अवलंबून होती तिथे अशी परिस्थिती हि एक चिंतेची बाब होती.परिणामी आपल्याला अमेरिकेसमोर अन्नासाठी भीक मागावी लागली होती कारण तेव्हा आपला भारत देश हा अन्ना-धान्याबाबत स्वालंबी नव्हता. अश्या या परिस्थितीवर मात करण्याकरिता डॉ स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक शेती मध्ये काही बदल करून उत्पादन वाढीकरिता भारतात हरित क्रांती घडवून आणण्यात आली. जास्त उत्पादन देणारे बियाणे, उत्पादन वाढवणाऱ्या पद्धतीचा उपयोग, सिंचनाच्या उत्तम सोयी, कीटकनाशके , रासायनिक खते, सुधारित यंत्रे अश्या विविध गोष्टींची उत्तम सांगड घालून हि हरित क्रांती घडून आली. हरित क्रांतीच्या प्रसार भारतात होत गेला आणि भारत हळू हळू अन्न-धान्याबद्दल स्वालंबी झाला.
जवळपास ५० कोटी
जनतेचे पोट भरण्याकरिता शेतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज होती आणि हरित क्रांती ने
ते साध्य करून दाखविल. पण यानंतर भरगोस उत्पादन घेण्याकरिता रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा प्रमाणाच्या बाहेर उपयोग करण्यात आला परिणामी
जमिनीचा पोत जाणे, पाणी रसायनयुक्त होणे, भूजल पाण्याची
पातळी खाली जाणे वगैरे समस्या निर्माण व्हायला लागल्या सोबतच अश्या या गहण शेती
करण्याच्या पद्धतीने पिकणारे अन्न कितपत सुरक्षीत आहे याबद्दल प्रश्न निर्माण होऊ
लागले. आणि या प्रश्नांना उत्तर म्हणून बऱ्याच लोकांनी शेतीच्या वेगवेगळ्या शाश्वत
पद्धतीचा अवलंब करायला सुरुवात केली ज्यात एकूण उत्पादनाला महत्व न देता निसर्ग
आणि निसर्गाच्या आणि विज्ञानाच्या नियमांना मध्यभागी ठेऊन शेती केली जाते.
नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, अध्यात्मिक शेती
वगैरे असे विविध प्रकार यामध्ये दिसून येतात. या नमूद केलेल्या दोन-तीन आणि इतर
पद्धतीमध्ये पण निसर्ग मध्यभागी असल्याने शेती पद्धती हि बऱ्यापैकी सारखीच आहे
काही छोट्या गोष्टींचा अपवाद वगळता. माणव जसजसा उत्क्रांत होत गेला तसतशी
पिढ्यादरपिढ्या शेतीपद्धतीमध्ये मध्ये
सुधारणा होत गेली, आणि हि सुधारणा सामाजिक समूहामार्फत होत गेली
त्यामुळे कुठली तरी पद्धती एका व्यक्तीच्या मालकी हक्काची आहे असे होत नाही. पण हे
इथेच थांबत नाही तर आमचीच शेती पद्धती कशाप्रकारे श्रेष्ठ आहे हे छाती ठोकून
सांगने हेच प्रत्यकक्षात शेती करण्यापेक्षा जास्त दिसून येते, आणि इथे
वेगवेगळ्या शेतकऱ्यांची वेगवेगळ्या वर्गात विभागणी केल्या जाते अथवा ती आपोआप होऊन
जाते. आपल्या देशातला शेतकरी हा बऱ्यापैकी शिक्षणापासून दूर राहिलेला आहे त्यामुळे
त्यांना सरकारी यंत्रणा किंवा कृषी केंद्रातुन जी माहिती मिळते त्या आधारित
त्यांची शेती सुरु असते व उत्पादन वाढीवर जोर दिला जातो. यासगळ्या प्रकारात जमीन खराब होत आहे किंवा निसर्गाची हानी होत
आहे याबद्दल विचार करायला त्याला सवड
सुद्धा मिळत नाही आणि यात त्याचा पण दोष नाही आहे. प्रत्येक माणसाला त्याचा परीने
त्याला जे जमेल आणि जे त्याचा आवाक्यात असेल ते तो करत असतो .
नैसर्गिक किंवा
सेंद्रिय शेतीकडे वळायचं म्हंटल तर सुरवातीचे २-३ वर्ष हे कमी उत्पादनाचे भोगावे
लागतात आणि हे २-३ वर्ष सर्वच पेलू शकतात असे नाही. अल्पभूधारक शेतकऱ्याचे एका
हंगामाचे पीक गेले तर त्याच्यावर जणू आभाळ कोसळल्यासारखे होते आणि त्याचा
अस्तित्वाचा प्रश्न येऊन ठाकतो त्यामुळे आपण रासायनिक शेती करणारे किती लबाड आणि
नफेखोर याप्रकारे हिणवत गेलो व आम्ही सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेती करणारे किती
नीतिमान व निसर्गाचे मूल्य जपणारे आहोत हा
केवळ बालिशपणा आहे. आधीच सुरक्षित अन्नाचा प्रश्न हा ऐरणीवर येऊन बसला आहे
आणि त्यात जर आपण अशी वर्गवारी करायला लागलो तर किती नवीन शेतकरी सुरक्षित
रसायनमुक्त अन्नासाठी सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीचा अवलंबन करेल ? तर कदाचित खूप
कमी. माझ्यासाठी जरी हा नीती आणि मूल्यांचा खेळ असला तरी काही लोकांनसाठी हा जीवन
मरणाचा प्रश्न असतो.
त्यामुळे न
हिणवता व नवीन वर्ग न बनावता सकारात्मकपणे शेतकऱ्यांना अन्न आणि निसर्गाबद्दल
समजावून सांगणे हे नेहमीच प्रभावी ठरेल.
Comments
Post a Comment