Skip to main content

उद्या कि आज ?

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या जीवनावश्यक मुल्यांचा पूर्णपणे विसर पडलेल्या भविष्यातील समाजाचे, ज्याला जीवनातील प्रत्येक गोष्टी मध्ये मुल्यवृधी ची सवय झालेली आहे, अश्या या परिस्थितीत मनुष्याच्या खाजगी जीवनावरील अतिक्रमण, मोठमोठ्या कंपनीचे आक्रमक धोरणे आणि त्याचे मानवी जीवनावरील होणारे दुष्परिणाम याचे विस्तृत विवरण नंदा खरे यांनी “ उद्या” या कादंबरीत केलेलं आहे.
मुल्यवृधीच्या मागे पळत असलेल्या ” उद्या “ कांदबरीतील विविध पात्रांच्या जीवनावरून त्यांची कशाप्रकारे कोंडी झालेली आहे हे दिसून येते. अगदी जीवनाश्यक वस्तूंच्या बाजारीकरणामुळे सामान्य लोकांवरील मुल्यावृधीचा ताण व त्यामधून तयार झालेली समाजातील प्रचंड मोठी दरी, यामुळे जीवन हे अगदी असह्य आणि निरस झालेलं आहे. नातीगोती खूप क्वचित झालेली आहे. लोकांच्या जीवनातील प्रेम,करुना या भावनेचे स्थान आता मुल्यवृधीने घेतलेले आहे. परिणामी समाजात गुन्हेगारी चे प्रमाण वाढत चालले आहे. निसर्गत कमजोर मानल्या जाणाऱ्या स्त्री वर याचा खूप वाईट परिणाम झालेला आहे. स्त्रियांचे बाहेर एकटे पडणे अशक्य झालेलं आहे.
भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन नंदा खरे यांनी “उद्या” मध्ये विविध गोष्टींची सांगड घालून, आपल्या स्वातंत्र्यावर कशाप्रक्रे अतिक्रमण होऊ शकते हे खूप स्पष्टपणे मांडलेल आहे. भरोसा आणि विकास या दोन उद्योगसमुहानी जवळपास प्रत्येक गोष्टीवर स्वताच प्रभुत्व निर्माण केलेलं आहे. सरकार हे फक्त या उद्योगसमूहाचे खेळणे बनून राहिलेलं आहे अस दिसते. प्रत्येक मनुष्याचे चे अस्तित्व एका “कार्डवर” आल्याने ज्यावर २४ तास नजर असते वेगळ काही करणे खूप अश्यक्य झालेलं आहे अस दिसत. भरोसा आणि विकास हे फक्त इतक्या वरच न थांबता कुणी काही वेगळ केल्यास त्यांना जीवे मारण, लोकांचे शोध बळजबरीने आपल्या नवे लाऊन घेण, मुलीं कमी असल्यामुळे त्यांची श्रीमंत लोकांसाठी शिकार करणे, जुन्या लोकवस्तीचे नाव बदलून नवीन नाव ठेवणे इत्यादी बऱ्याच गोष्टीमध्ये आहे. भरोसा आणि विकास या समूहांनी अगदी मंत्यापासून तर साध्या कारकुना पर्यंत सगळ्यांना आपल्या खिशात घेतलेलं आहे आणि हवे ते त्यांचाकडून करून घेत आहे.
मोन्सागील नावाच्या मोठ्या शेती संशोधन कंपनी विरोधात स्थानिक गावकऱ्यांचा लढा, त्यांची स्वतची शेती आणि जमीन वाचून ठेवण्याची जिद्द यावरून खेडे आणि त्यांची अस्तित्व बद्दलची तळमळ यावरून असा कळते कि मुल्यवृधी हि खूप जास्त भौतिक गोष्ट आहे, जिला मिळवून कुणी कधीच आनंदी राहू शकत नाही. शेतकऱ्यांचा लढ्यात साथ देणारे नक्षलवादी आणि सरकार यामध्ये होणाऱ्या चकमकीतून मोन्सागील चे पोलीस खात्यावारील आणि सरकारवरील वरील प्रभुत्व कळते. भूराजकारण, खनिज-राजकारण आणि या मागील त्याचे आर्थिक आणि सामाजिक प्रभाव हे खूप विस्तृत पणे विविध देशांचे उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. म्हणतात न कि “अतिश्रीमंत आणि बलवान वाटेल ते करतात आणि गरीब दुर्बळ यांना त्यांचा वाटेत जे येईल ते सोसाव लागते.”

कारपोरेट युगाचे वर्चस्व, प्रत्येक वस्तूचे बाजारीकरण, व्यक्तिस्वातंत्र्यावर आलेल बंधन, समाजातील प्रचंड असंतोष, असमानता हे सगळ “उद्या” मध्ये वाचतांनी आपण “उद्या” बद्दल वाचत नसून “आज” बद्दल वाचत आहो कि काय ? अशी भीती वाटत होती. आपण (मी) खरोखर कुठल्या दिशेने जात आहे हे याचा प्रत्यय घेण्यासाठी प्रत्येकाने “उद्या“ हि कादम्बरी वाचावी असे मला वाटते. कारण “आज आता वाचालही पण उद्या......” चे काय  ???

Comments

Popular posts from this blog

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

अव-काळाचे आर्त : चंगळवादाचे थैमान…

संपूर्ण जग विकून हडप केलेल्या समाजाचे पाय कोणत्या दिशेने जाऊ शकतात, याचे विवेचन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे- ‘द स्पेस मर्चंट्स’! पृथ्वी आणि पृथ्वीवरील संपूर्ण संसाधने ही फक्त मानवाच्या उपभोगासाठीच आहेत असा समज असलेल्या आणि नीतिमत्तेची चाड न बाळगणाऱ्या समाजाचे विवरण लेखकाने ‘द स्पेस मर्चंट्स’मध्ये केले आहे. या कादंबरीचा नायक एका मोठ्या जाहिरात कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. सकाळी उठल्यापासून ज्या-ज्या वस्तूंचा किंवा संसाधनांचा उपभोग मनुष्य घेतो, ती-ती वस्तू वा संसाधन जास्तीत जास्त लोकांना विकण्याचे काम ही जाहिरात कंपनी करत असते. फ्रेडरिक पोल आणि सीरील कॉर्नब्लथ लिखित, १९५३ साली प्रथम प्रकाशित झालेल्या, ‘द स्पेस मर्चंट्स’ या कादंबरीमध्ये चंगळवादामुळे निर्माण झालेल्या आर्थिक-सामाजिक परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने जवळपास संपुष्टात आल्याने उपभोगासाठी नवीन संसाधने मिळावीत या हेतूने सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या शोधात विविध देशांतील सरकारे आणि संलग्न कंपन्या यांमध्ये स्पर्धा सुरू असते. या स्पर्धेच्या अवतीभोवती ही कादंबरी गुंफलेली आहे. कादंबरीचा नायक म्हणजेच मिच कोर्टेने...

सेंद्रिय अन्न: काळाची गरज

 गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, सुरक्षित अन्न या चळवळींनी शेतकरी-ग्राहकांमध्ये शेती आणि अन्नप्रणाली बद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच २०१२-१३ साली कच्च्या घाणीच्या तेलाचा किंवा सेंद्रिय शेतमालाचा साधा कुठे उल्लेख पण होत नव्हता आणि आज नागपूर मध्ये आपल्याला ठिकठिकाणी कच्च्या घाणीच्या तेलाचे आणि सेंद्रिय शेतमालाचे दुकान दिसायला लागले आहे. बाजारभावापेक्षा थोडा महाग असून सुद्धा लोकांचा कल या उत्पादनांकडे वाढतांना दिसतो आहे. मानवी आणि एकंदर पृथ्वीच्या आरोग्याचा विचार केला तर सध्याची आपली वाटचाल हि बरीच आशादायी आहे.   याच काळात कर्करोग, मधुमेह आणि इतर रोगांचा सुळसुळाट पण भरपूर वाढलेला दिसतो आहे. काही वर्षांपूर्वी कर्करोग व मधुमेह हे श्रीमंत आणि शहरी लोकांचे आजार समजले जायचे. आज परिस्थिती अशी आहे की कर्करोगाच्या निदानात फार नाविन्य राहिलेलं नाही आणि मधुमेह तर आज सर्वसामान्य होऊन बसला आहे. आज या रोगांची विभागणी शहरी किंवा ग्रामीण अशी होऊ शकत नाही. आपल्या आहारात वाढलेल्या साखर, मीठ आणि चरबीच्या प्रमाणामुळे व ...