भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपली परिस्थिती अन्न सुरक्षतेच्या बाबतीती जेमतेम होती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अन्न सुरक्षा म्हणजे सर्वाना चांगल्या दर्जाच्या अन्नाचा शाश्वत १२ महिने , वेळेवर आणि पुरेसा पुरवठा. एकूणच पुरेसा अन्नाचा साठा नसताना बफर साठा(अन्न -धान्याचा) जमा करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा पुरेसे अन्न-धान्याचे उत्पादन नसल्याने बफर साठा पण असायला हवा हा विचारच क्षुल्लक होता. प्रत्येक देश हा अन्न -धान्याचा बफर साठा साठवून ठेवत असतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात (ओला किंवा कोरडा दुष्काळ , भूकंप इत्यादी) हा साठा उपयोगात आणला जातो. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच १०-१५ वर्षांनी साठी च्या दशकात आपल्यावर उपासमारीची पाळी आली. भारतासारख्या कृषीप्रधान देशात जिथे जवळपास ७०-७५% लोकसंख्या उपजिवीकेसाठी शेती वर अवलंबून होती तिथे अशी परिस्थिती हि एक चिंतेची बाब होती.परिणामी आपल्याला अमेरिकेसमोर अन्नासाठी भीक मागावी लागली होती कारण तेव्हा आपला भारत देश हा अन्ना-धान्याबाबत स्वालंबी नव्हता. अश्या या परिस्थितीवर मात करण्याकरिता डॉ स्वामिनाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक शेती...