गेल्या ७ महिन्यात वेगवेगळ्या सदरामध्ये आपण समाजात असलेल्या विविध प्रकारच्या वर्गवारीवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. त्यांचे प्रमाण , गुणधर्म , समाजावर होणारे परिणाम या बाबींचा पण विचार करण्यात आला. याप्रकारच्या वर्गवार्या भूतकाळात पण होत्या आणि त्या भविष्यकाळात पण राहणारच. त्यांना ओळखणे , त्याबद्दल विचार करणे आणि चर्चा घडवून आणण्याचे धाडस आपण अंगीकृत करणे ही काळाची गरज होत चाललेली आहे. आपल्या सतत प्रयत्नांनी आपण त्यांची तीव्रता आणि त्यांच्या होणार्या परिणामांवर मात्र थोडं का होईना आळा घालू शकतो. आता चालू असलेल्या दशकामध्ये भारत देशाने आणि भारतातील जनतेने अनेक प्रकारचे चढ-उतार (बहुतेक टोकाचे) बघितलेले आहे. यात सामाजिक , आर्थिक , धार्मिक , वैयक्तिक , शैक्षणिक , सांप्रदायिक , इतर जटिल व न दिसणार्या बाबींचा पण समावेश आहे. मागील काही वर्षापासून एक वर्गवारी (तशी जुनीच) नव्याने वर डोक काढत आहे. ती वर्गवारी म्हणजे , समाजातील लोकांना आपल्या पूर्वग्रहीत विचारांमुळे सोयीस्कर अशे ठपके लावणे व या ठपक्यानुसार त्यांची विविध गटांत विभागणी ...