Skip to main content

Posts

अव-काळाचे आर्त : स्वातंत्र्य-सुरक्षिततेचा सवाल!

तुमच्या स्वत:च्या अपत्याचे नाव ठेवायची परवानगी तुम्हाला नसेल तर काय होईल? किंवा नेमकी पाच-सहा नावेच सर्वांना वाटून दिली, तर? किती लोकांची नावे समान असतील? सपाट समानतेचा हाच डिस्टोपियन धागा पकडून आयरा लेविन यांनी ‘धिस परफेक्ट डे’ ही कादंबरी गुंफलेली आहे. १९६९ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीला तत्कालीन शीतयुद्धाची पाश्र्वभूमी आहे. त्यात स्टालिनवादानुसार चालणाऱ्या एका, भविष्यातल्या विश्वरूपी व्यवस्थेची कल्पना केली आहे, त्या व्यवस्थेला ‘कुटुंब’ असे म्हटले जाते. त्या कुटुंबातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय मायबाप सरकार घेताना दिसते. ‘चिप’ नावाच्या एका पुरुषाच्या आयुष्याभोवती ही कादंबरी फिरते. शाळेच्या पटांगणात खेळणाऱ्या चिप आणि इतर मुलांच्या संभाषणांतून समाजातील लोक दोन भागांत विभागले गेल्याचे वाचकाला दिसते. ज्याप्रमाणे हल्ली आपण धर्म, जात, वर्ण, पक्ष, देश आणि इतर गोष्टींच्या आधारे ‘ते आणि आम्ही’ अशा विभागण्या सहजगत्या करतो, अगदी त्याचप्रमाणे कादंबरीमध्ये ‘रोगट आणि निरोगी’ अशी लोकांची विभागणी दिसते. जगातील काही व्यक्ती एका असाध्य रोगाने पछाडलेल्या आहेत, अशी कादंबरीतली ...

न दिसणारे नेपोटीज्म

काही महिन्यांपूर्वी एका भारतीय अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी आणि त्यामागे कोण किंवा काय असेल हे अद्याप एक गुढचं आहे. पण त्यानंतर ज्याप्रकारे समाजातील सर्वच भागांतून हिंदी चित्रपट सृष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने हिणवले गेले , ते अगदी लाजिरवाणे होते. प्रत्येक दोन-तीन दिवसात एक नवीन कारण घेऊन हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य केल्या जात होते. त्यातले एक बरेच गाजलेले कारण म्हणजे “नेपोटीज्म( Nepotism)” . समाजातील बहुतेक लोकांना “नेपोटीज्म” चा अर्थ सुद्धा माहिती नाही तरी या शब्दाचा कित्येक दिवस रवंथ केल्या गेला. गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून राजकरणात पण याच विषयाचा बोलबाला आहे . या धर्तीवर एका पूर्वनियोजित कामाप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य करण्यात आले. “ नेपोटीज्म” म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तिला एखाद्या कामाकरिता दिले गेलेले प्राधान्य. अश्या वेळेस त्या व्यक्तीची पात्रता , क्षमता आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते. पर्यायी दूसरी व्यक्ति त्या विशिष्ट व्यक्तिपेक्षा उत्तम किंवा योग्य असून सुद्धा त्याचा विचार केला जात नाही. वेगळ्या श...

स्वार्थापोटी

गेल्या 1 महिन्यापासून संपूर्ण भारतात इंडियन प्रिमियर लीग चा धुमाकूळ दिसतोय. यूरोपियन फुटबॉल च्या धर्तीवर भारतात सुद्धा शहरानुसार व्यावसायिक तत्वावर क्रिकेट खेळण्यास सुरुवात झाली. विविध शहरानुसार संघ व खेडाळू वाटले गेले. हा पूर्ण प्रकार अगदी व्यावसायिक तत्वावर सुरू असतो. यात देशाचा अभिमान किंवा शहराचा अभिमान वगैरे काहीच नसते. केवळ मनोरंजन हा हेतु लक्षात घेऊन या   लीग चे आयोजन केले जाते. गेल्या आठवड्यात चेन्नई आणि कोलकाता या दोन संघात एक सामना झाला व कोलकाता संघाने चेन्नई संघावर मात केली. चेन्नई संघाचा कर्णधार आहे महेंद्रसिंह धोनी व त्याला ५ वर्षाची छोटी मुलगी आहे. हा पराभव काही लोकांनी इतका मनावर लावून घेतला की चक्क धोनीच्या मुलीला सार्वजनिकरित्या नको त्या धमक्या देण्यात आल्या. कामगिरीसाठी संघाची किंवा संघातील खेडाळूंची टीका करणे हे साहजिकच आहे. पण एका व्यावसायिक संघाच्या पराभवाबाबत इतके वाईट वाटणे आणि त्यामुळे खेडाळूंच्या घरच्यांना धमकी देणे हा सर्वच प्रकार आज आपण कुठल्या प्रकारच्या समाजात राहतो याची जाणीव करून देते. गेल्या काही वर्षापासून नको त्या खालच्या पातळीवर जाऊ...

अहोभाग्य

आपला समाज हा असंख्य अश्या विविध वर्गांमधे आणि तुकड्यांमधे विभागलेला आहे . गेल्या १८ स्तंभातून आपण समाजात अस्तीत्वात असलेल्या वेगवेगळ्या वर्गवार्‍यांवर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ज्या वर्गात मोडतो त्याचे काही फायदे व काही तोटेसुद्धा असतातच. या फायद्या आणि तोट्याचे प्रमाण हे आपण कुठल्या वर्गात मोडतो त्याच्यानुसार नेहमी बदलत असते. काही फायदे आणि तोटे हे निव्वळ आपण कुठल्या धर्मात आणि जातीत जन्म घेतला आहे यावर अवलंबून असतात व त्यात आपण फार बदल करू शकत नाही. याचप्रमाणे आपण कुठे राहतो ( शहर किंवा गाव ), आपल्या आजूबाजूला असलेल्या सोयी-सुविधा , आपल्या घरी असलेली शिक्षणाची परंपरा अश्या अनेक मोजता न येणार्‍या बाबीं आपल्या जीवनातील फायदे आणि तोटे ठरवत असतात. यापैकी कुठलीच परिस्थिति ही आपण स्वइच्छेने निवडलेली नसते. आपल्या परिसरातील सोयी-सुविधा सोडल्या तर बाकी सर्वच बाबी या आपल्याला जन्मजात मिळालेल्या असतात. नशीब बलवत्तर असल्यास आयुष्यभर तुम्हाला फायदे होत राहणार नाहीतर बाकी वर्गवार्‍यांसोबत या वर्गवारीला सामोरे जावे लागेल हे नक्की. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन होत असतांना किंवा ए...

कार्य-करता

गेल्या ८-९ वर्षात समाजातील कळत नकळत होणार्‍या विविध प्रकारच्या अन्यायाविरुद्ध लढा देणार्‍या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्‍या भरपूर व्यक्तींसोबत आणि सामाजिक संस्थांसोबत अगदी जवळचा संबंध आला. यातील काही व्यक्तींची किंवा संस्थांची पद्धती ही संघर्षाची तर काहींची नवनिर्माणाची. पण जवळपास प्रत्येक व्यक्तीचं आणि संस्थेचं काम हे उल्लेखनीय आणि तितकेच समाजाच्या हिताचे आहे. याप्रकारचे काम करणार्‍या व्यक्तीला समाजात “कार्यकर्ता” किवा “सामाजिक कार्यकर्ता” म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रातील काही लोकं स्वतंत्र्य म्हणजेच कुठल्याच संस्थेमार्फत किंवा संस्थेच्या नावाखाली काम न करण्याला पसंती देतात. तर काही लोकांना संस्थेसोबत काम करणे पटते. स्वतंत्र व्यक्तीगत काम करण्याचे तसेच संस्थेमार्फत काम करण्याचे साहजिकच काही फायदे तसेच काही तोटेसुद्धा असतात. स्वतंत्र काम करत असतांना तुमचे काम जर प्रस्थापितांच्या हितसंबंधांना उघड करत असतील किंवा प्रस्थापितांद्वारे होणार्‍या अन्यायाला उघड करत असतील तर तुमचे दैनंदिन जगणे हे अवघड होऊ शकते. दिवसेंदिवस ज्याप्रकारचे असहिष्णु वातावरण भारतात वाढताना दि...

सत्यगाथा

तीन महिन्यांपूर्वी म्हणजे जून महिन्यात एका भारतीय कलाकाराचा मृतदेह त्याच्या खोलीत सापडला. त्याचा खून झाला किंवा त्याने आत्महत्या केली हे अद्याप कळलेले नाही. तेव्हापासून संपूर्ण भारताला किंवा भारतातील माध्यमांना फक्त आणि फक्त त्या घटनेचे वेध लागलेले दिसत आहेत. त्या घटनेनंतर कोरोंना ,  पुरस्थिती , बेरोजगारी , डबघाईला आलेली अर्थव्यवस्था अशी बरीच संकटे सतत भारताला प्रश्न विचारात आहे. इतके असूनही अपवाद एक दोन माध्यमे सोडली तर कुणीच या खर्‍या प्रश्नांबद्दल बोलत नाही आहे. हा जोमात सुरू असलेला खेळ सर्वांनाच माहिती आहे , तरी मी हे लिहिण्याचा खटाटोप का करतोय हे बघूया. महात्मा गांधीजींचे तीन माकड हे भारतात बरेच प्रसिद्ध आहे. या तीन माकडांपैकी एकाने त्याचे डोळे झाकलेले आहे , दुसर्‍याने कान झाकलेले आहे तर तिसर्‍याने तोंड झाकलेले आहे. या तीन माकडांच्या तत्वज्ञानाचे मूळ जपान या देशातील आहे. साधारण १७ व्या शतकापासून या तत्वज्ञानाचा उपयोग होताना दिसतोय. हे उदाहरण “वाईट बघू नका , वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका” अशी शिकवण देते. शांतता आणि सहनशीलतेच्या प्रचारात या तत्वज्ञानाचा महात...

रंग माझा राखाडी

रंगांच्या संचामधे काळ्या आणि पांढर्‍या रंगांना कमालीचे महत्त्व असते. दोन्ही रंग हे स्वतः मधे परिपूर्ण असून त्यांचे एक वेगळे भावनिक आणि लाक्षणिक अस्तित्व आहे. या दोन्ही रंगांचा स्वभाव मात्र एकमेकांच्या अगदी उलट. पांढरा रंग हा शांतता , शुद्धता , सुरक्षितता , प्रकाश , सज्जनता अश्या विविध बाबींचा प्रतीक आहे. तर दुसरीकडे काळा रंग हा गूढ , रहस्य , संताप , कुरापत , अधिकार , भय , शक्ती असल्या विविध बाबींचा प्रतीक मानला जातो. या दोन्ही रंगातील आणि त्यांचा गुणधर्मातील तफावत ही अगदी उघड , स्पष्ट आणि प्रकर्षाने जाणवणारी आहे. त्यामुळे या दोन्ही रंगांच्या बाबतीत संभ्रमात पडणे हे अतिशय कठीण. काळ्या आणि पांढर्‍या रंगां मध्ये असंख्य अश्या विविध राखाडी छटा येतात. या छटांमध्ये काळ्या आणि पांढर्‍या दोन्ही रंगांचे प्रमाण हे वेगवेगळे असते. एखाद्या छटेमध्ये पांढरा रंग वरचढ असतो तर दुसर्‍या छटेमध्ये काळा रंग हा वरचढ असतो. याच धर्तीवर मानवी स्वभाव आणि समाज पण विविध छटांनी रंगलेला असतो. कुठलीच व्यक्ति आणि त्या व्यक्तीचा स्वभाव हा एकाच बाबीने परिपूर्ण असेल असे होत नाही. स्वभावातील आणि आय...