काही महिन्यांपूर्वी एका भारतीय अभिनेत्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्या का केली असावी आणि त्यामागे कोण किंवा काय असेल हे अद्याप एक गुढचं आहे. पण त्यानंतर ज्याप्रकारे समाजातील सर्वच भागांतून हिंदी चित्रपट सृष्टीला वेगवेगळ्या पद्धतीने हिणवले गेले , ते अगदी लाजिरवाणे होते. प्रत्येक दोन-तीन दिवसात एक नवीन कारण घेऊन हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य केल्या जात होते. त्यातले एक बरेच गाजलेले कारण म्हणजे “नेपोटीज्म( Nepotism)” . समाजातील बहुतेक लोकांना “नेपोटीज्म” चा अर्थ सुद्धा माहिती नाही तरी या शब्दाचा कित्येक दिवस रवंथ केल्या गेला. गेल्या वीस-पंचवीस वर्षापासून राजकरणात पण याच विषयाचा बोलबाला आहे . या धर्तीवर एका पूर्वनियोजित कामाप्रमाणे हिंदी चित्रपट सृष्टीला लक्ष्य करण्यात आले. “ नेपोटीज्म” म्हणजे एखाद्या विशिष्ट व्यक्तिला एखाद्या कामाकरिता दिले गेलेले प्राधान्य. अश्या वेळेस त्या व्यक्तीची पात्रता , क्षमता आणि त्याच्याकडे असलेले कौशल्य याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले जाते. पर्यायी दूसरी व्यक्ति त्या विशिष्ट व्यक्तिपेक्षा उत्तम किंवा योग्य असून सुद्धा त्याचा विचार केला जात नाही. वेगळ्या श...